नाथनगरमधील नाल्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:56+5:302021-09-09T04:40:56+5:30
... रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी धारूर : शहरातील संभाजीनगर भागातून ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाणारे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ...
...
रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी
धारूर : शहरातील संभाजीनगर भागातून ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाणारे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने वाहनातून जाताना रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती तत्काळ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सांवत यांनी केली आहे.
....
रुईधारूर येथील स्मशानभूमीची दुरवस्था
धारूर : तालुक्यातील रुईधारूर येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे अतिक्रमण असल्याने अंत्यविधी नदीपात्राजवळ करावा लागतो. त्यामुळे येथील गावठाणातील स्मशानभूमीतील अतिक्रमण तहसील कार्यालयाने तत्काळ काढून येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लाववा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
...
आवरगावजवळील पुलावर वाहतूक ठप्प
धारूर : धारूर-आडस रस्त्यावरील आवरगाव गावाजवळ असणा-या राज्य रस्त्यावरील पुलाची उंची कमी आहे. थोडा पाऊस झाला तर वाहतूक ठप्प होते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून रुंदी वाढवावी, अशी मागणी आवरगाव येथील नागरिकांनी केली आहे.