अंबाजोगाई, केज, नेकनूर भागात नमिता मुंदडा यांच्या कॉर्नर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:50 PM2019-10-13T23:50:22+5:302019-10-13T23:51:12+5:30

केज विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरणात पूर्णत: तापले आहे. भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेण्यात येत असून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले.

Namita Mundada's Corner Meeting in Ambajogai, Cage, Nekanur area | अंबाजोगाई, केज, नेकनूर भागात नमिता मुंदडा यांच्या कॉर्नर सभा

अंबाजोगाई, केज, नेकनूर भागात नमिता मुंदडा यांच्या कॉर्नर सभा

Next
ठळक मुद्देमला आशीर्वाद द्या : मतदारांशी संपर्क करीत केले आवाहन

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरणात पूर्णत: तापले आहे. भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेण्यात येत असून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले.
भाजपा - शिवसेना - रासप -रयतक्रांती - रिपाइं महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरातील गावांमध्ये नमिता मुंदडा व समर्थक नेत्यांनी भेटी देत आशीर्वाद देण्याचे मतदारांना आवाहन केले.
केज विधानसभा मतदारसंघात सत्ता नसतानाही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा नेहमी मतदारांच्या संपर्कात राहिले आहेत. त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. नंदकिशोर मुंदडा हे दिवसांतून १४ ते १६ तास जनतेच्या सेवेत असतात, असे दिनेश भराडिया यांनी सांगितले. गेल्या सात वर्षात सत्ता नसतांनाही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांचे विविध माध्यमातून कार्य सुरूच आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन नगरसेवक संतोष शिनगारे यांनी यावेळी केले. कै. डॉ. विमल मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघ हे कुटुंब मानून मतदार संघाला न्याय दिला. त्याच धर्तीवर आजही नमिता मुंदडा जनसामान्यांसाठी कार्यरत आहेत. या कुटुंबाने समाजसेवेचा घेतलेला वसा पुढे चालविण्याचा निर्धार केला असून त्यांना साथ देण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे यांनी केले.
विविध विकास कामांचा फायदा होतोय...
कै. गोपीनाथराव मुंडे व डॉ. विमल मुंदडा, यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे झाली. मुंडे यांचा राजकीय वारसा जपत पालकमंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यात विकासाच्या माध्यमातून मोठा कायापालट केला. विविध विकासाच्या योजना जिल्हाभर राबविल्या. याचा मोठा फायदा प्रचार यंत्रणेत भाजपाला होत असल्याचे संतोष लोमटे म्हणाले. तसेच सलग २५ वर्षे विमल मुंदडा यांनी मतदार संघावर एकतर्फी अधिराज्य गाजविले. या मतदारसंघाचा विकासात्मक परिवर्तनाच्या त्या शिलेदार ठरल्या. मतदारसंघाला त्यांचा लाभलेला वारसा आगामी काळात नमिता मुंदडा जोपासतील, अशी खूणगाठ मतदारांनी बांधल्याचे सभापती मधुकर काचगुंडे, नगरसेविका उज्वला पाथरकर म्हणाल्या. भाजपाची मोठी ताकद नमिता मुंदडा यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल्याने त्यांच्यासाठी विजयपथ दूर राहिला नसल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले.

Web Title: Namita Mundada's Corner Meeting in Ambajogai, Cage, Nekanur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.