हिंगणीत राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:26 AM2020-12-25T04:26:37+5:302020-12-25T04:26:37+5:30

यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याविषयी तसेच शेतीमध्ये विविध आंतरपीक घेऊन आपले उत्पन्न वाढवून नवनवीन प्रयोग करून प्रगती साधावी या ...

National Farmers' Day celebrated in Hingani | हिंगणीत राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

हिंगणीत राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

Next

यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याविषयी तसेच शेतीमध्ये विविध आंतरपीक घेऊन आपले उत्पन्न वाढवून नवनवीन प्रयोग करून प्रगती साधावी या विषयी मार्गदर्शन केले. तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी अविनाश सोळंके यांनी त्यांच्या शेतात घेतलेले सीताफळ पीक यातून त्यांना कसे उत्पन्न मिळत आहे व त्यांनी कशी लागवड केली, एकरी खर्च व्यवस्थापन याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रकल्प समन्वयक वली तांबोळी यांनी शेतकऱ्यांसमोर उभी असणारी आव्हाने, पाणी व्यवस्थापन, मानसिक आरोग्य सुदृढ राखून कुटुंबाची काळजी घेऊन कुटुंब सदस्यांना सोबत घेऊन शेतीपूरक जोडधंदे करून प्रगती साधावी, या विषयावर मार्गदर्शन केले. उपसरपंच योगेश सोळंके यांनी आभार मानले. त्यांनी गावातील शेतकऱ्यांनी पुढे येऊन जास्तीत जास्त कृषी योजनेच्या फळबाग योजनेतून व इतर योजनांचा लाभ घ्यावा, असे मत मांडले. सूत्रसंचालन एकनाथ शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील युवकांनी परिश्रम घेतले.

Web Title: National Farmers' Day celebrated in Hingani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.