वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:16+5:302021-02-27T04:45:16+5:30
'रिअल लाइफ अँप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स' या विषयावर सदर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख ...
'रिअल लाइफ अँप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स' या विषयावर सदर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख होते. त्यांच्या वतीने स्वागतपर व उद्घाटनपर भाषण पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश यांनी केले. साधनव्यक्ती म्हणून त्रिची, तामिळनाडू येथील कौवेरी कॉलेज ऑफ विमेन येथील प्रा. डॉ. के. कलाईअरासी यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. व्याख्यानात त्यांनी गणिताचा इलेक्ट्रॉनिक्स व टेलेकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक सेक्टर आदि क्षेत्रात प्रत्यक्षात कशा प्रकारे उपयोग होतो हे विस्तृतपणे सांगितले. तसेच विविध क्षेत्रात गणित विषयाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. गणित हा विषय केवळ पुस्तकी अभ्यासाइतपत मर्यादित नसून जीवनातील प्रत्येक टप्प्यावर तो उपयुक्त आहे, म्हणून गणित विषयाची भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने व खेळीमेळीने या विषयाची निवड करून अध्ययन करावे असेही आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. कुशाबा साळुंके यांनी केले. साधनव्यक्तीचा परिचय गणित विभागप्रमुख प्रा. पद्माकर ससाणे यांनी दिला. आभारप्रदर्शन डॉ. अशोक नाईक यांनी केले. विविध राज्यांमधून एकूण ६२ जणांनी सहभाग घेतला.
यशस्वितेसाठी प्रा. अमोल भालेराव, प्रा. मुख्तारखान पठाण, प्रा. बालाजी घोडके यांचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभले. आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. बळीराम राख, उपप्राचार्य डॉ. किशोर मचाले, डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार यांचे मार्गदर्शन लाभले.