'ईडी'च्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे परळी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:35 PM2019-09-26T13:35:22+5:302019-09-26T13:36:58+5:30

पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है

Nationalist Congress band in parali in protest of ED action | 'ईडी'च्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे परळी बंद

'ईडी'च्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे परळी बंद

Next

परळी : 'टायगर अभी जिंदा है... पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है..' अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परळी बंदचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्यावर सरकारने केलेली कारवाई  सुडबूध्दीची असून याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला. 

शिखर बँकेच्या  भ्रष्टाचाराप्रकरणी कोणताही संबंध नसताना केवळ राजकीय सुडबूध्दीने आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत असलेल्या पाठींब्यामुळे घाबरलेल्या भाजपा सरकारने शरद पवार यांच्या वर  गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे संपूर्ण राज्याप्रमाणेच परळी शहरातही तिव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली तर गुरूवारी परळी बंदचे आवाहन केले होते.

परळी बंदच्या या आवाहनाला आपले दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला. शहरातील दुकाने, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वाजल्यापासूनच शहरात फिरून व्यापार्‍यांना शांततेच्या मार्गाने बंद पाळून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील शिवाजी चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तिव्र निदर्शने केली. 

आंदोलनात शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, ज्येष्ठ नेते सुरेश टाक, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, केशव बळवंत, संजय फड, बाळुसेठ लड्डा, गोपाळ आंधळे, श्रीकांत मांडे, सुरेश गित्ते, कमलकिशोर सारडा, प्रताप देशमुख, शंकर आडेपवार, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी सिराज भाई, शंकर कापसे, सचिन जोशी, दिलीप कराड, विष्णु साखरे, के.डी.उपाडे, अनंत इंगळे, बळीराम नागरगोजे, जमील अध्यक्ष, सचिन देवकर, सचिन मराठे, महेश शेप, महेंद्र रोडे, दत्ता सावंत, नरेश हालगे, नाजेर भाई, वाजेद भाई,  एस.यु.फड, सतिश गंजेवार, तौफीक गंजेवार, कृष्णा मिरगे, लालू पठाण, रवि आघाव, शकील कच्छी, रौफीक पटेल, भागवत गित्ते, महिपाल सावंत, पापा ठाकूर, कवडेकर सर, मुसा भाई, चौहान सर, प्रदिप आरसुळे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: Nationalist Congress band in parali in protest of ED action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.