राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत; आडसकरांचा विजय निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:52 PM2019-10-10T23:52:35+5:302019-10-10T23:53:17+5:30
फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पुरुषोत्तम करवा।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : मोहन जगताप व त्यांचे कार्यकर्ते मागील आठ दिवसांपासून आडसकरांच्या कामाला जोमाने लागले आहेत. महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम आहे. फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझे वडील सोनाजीराव रांजवण, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील , दादासाहेब रांजवण व इतर काही जणांना हा साखर कारखाना उभा करायचा होता व त्या दृष्टीने त्यांनी प्रक्रि या सुरू केली होती. त्यात आमचे वडील हे संस्थापक अध्यक्ष होते. परंतु सुंदरराव सोळंकेसाहेब हे निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्याकडे काहीतरी पद असावे म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना कारखान्याचे चेअरमन केले. त्यावेळी माझ्या वडीलांनी मोठ्या प्रमाणात शेअर गोळा करून कारखाना उभारणीसाठी योगदान दिलेले आहे.
रमेश आडसकर हे सक्षम आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात सिद्ध होऊ शकतात. तसेच रमेश आडसकरांनी एमआयडीसीमध्ये तात्काळ उद्योग आणल्यास युवकांना नोकरीची संधी मिळू शकते, रुग्णांची संख्या पाहता उपजिल्हा रूग्णालय हे तात्काळ होणे आवश्यक आहे व ते तात्काळ हे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. एव्हाना आमची मागणी देखील तशीच आहे. माजलगाव तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा नक्कीच आडसकर हे सोनं करून दाखवतील, असा आम्हाला विश्वास आहे.
वडील सोनाजीराव रांजवण यांना वैद्यकीय अधिकाºयाची नोकरी सोडून राजकारणात आणल्यानंतर सुरु वातीला सुंदरराव सोळंके यांचे विश्वासू म्हणून त्यांनी चांगले काम केले परंतु त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला त्यावेळी देखील विरोध केला म्हणून ते अध्यक्ष व उपाध्यक्ष असताना तब्बल १५ ते २० वेळा सोनाजीराव यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. मात्र वडिलांनी आपल्या मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवत प्रत्येक वेळा आलेला अविश्वास परत लावला परंतु असे असतानाही प्रकाश सोळंके हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आम्ही त्यांची साथ सोडली नाही मात्र आता आम्हाला टाळण्याचा ‘कळस’ झाल्याने आम्हाला आमची नवीन वाट शोधावी लागली, असे ते
म्हणाले.