सरकारच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:25 AM2017-11-28T00:25:31+5:302017-11-28T00:26:01+5:30
बीड : राज्य व केंद्र सरकार सर्वत्रच अपयशी ठरत आहे. शेतकºयांना दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. शेतकºयांना ...
बीड : राज्य व केंद्र सरकार सर्वत्रच अपयशी ठरत आहे. शेतकºयांना दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. शेतकºयांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले आहे. या सरकारच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी शिरूर, परळी, अंबाजोगाई व धारूरमध्ये ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकरीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, मागील वर्षी नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई द्यावी, लोडशेडिंग बंद करावी, खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावा, शेतीतील नादुरुस्त रोहित्र दुरूस्त करावे, शेतीमालाला हमी भाव द्या, खरेदी केंद्र सुरु करा, गुजरात राज्याच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर पाचशे प्रति क्विंटल बोनस द्यावा, विषारी औषध फवारणीमुळे बळी पडलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला दहा लाख आर्थिक मदत द्यावी, केंद्र सरकारच्या गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतकºयांना त्यांच्या मालकीची भाकड जनावरे सांभाळणे अशक्य झाले आहे. ही जनावरे २५ हजार रुपये प्रति जनावरास किंमत देऊन खरेदी करावे किंवा भाकड जनावरांसाठी प्रति दिवस ६० रु. पशुखाद्याची सोय करावी, दुधाचे दर वाढवावेत, कापूस, तूर, सोयाबीनची खरेदी केंद्रे सुरु करावीत, नरेगा अंतर्गत जाचक अटी रद्द करून फळबाग योजना पुन्हा सुरु करावी, तुषार योजनेचे अनुदान मिळाले नाही, ते तातडीने अदा करावीत इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
परळीत काढली पदयात्रा
परळी : राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर व तालुका शाखेच्या वतीने सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी चौक ते तहसील कार्यालयावर पदयात्रा काढण्यात आली. घोषणाबाजीही झाली. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
जि.प. सदस्य अजय मुंडे, तालुका अध्यक्ष अॅड. गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मीक कराड , बालासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंबाजोगाईत सरकारविरोधी घोषणाबाजी
अंबाजोगाई : शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने अंबाजोगाईत हल्लाबोल आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेले मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, पं.स.सभापती मीरा भताने, जि.प. सदस्य शंकर उबाळे, तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे, गणेश देशमुख, बन्सीधर सिरसाट, राजपाल लोमटे, अमर देशमुख, उल्हास पांडे, बाळासाहेब देशमुख, कल्याण भिसे, विश्वंभर फड, शिवाजी सिरसाट, ज्ञानोबा जाधव, सुधाकर शिनगारे, राजाभाऊ शेप, गोविंदराव देशमुख, बाळासाहेब सोनवणे, विलास मोरे, सत्यजित सिरसाट, गौतम चाटे, प्रमोद भोसले, सोमनाथ धोत्रे, शिरीष मुकडे, अविनाश उगले, शिवाजी गायके, धर्मराज धुमाळ, विठ्ठल कोकरे, वसंत कदम, ताराचंद शिंदे, दत्ता शिंदे, विलास शिंदे, रमेश चव्हाण, विलास सोळुंके, स्वप्नील सोनवणे, आत्माराम माळी, विष्णू काळे, राजेश्वर चव्हाण, दत्ता यादव, नवनाथ अंबाड, हसन चाऊस, सूर्यकांत पवार, काकासाहेब जामदर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
शिरूरमध्ये घोषणांनी शहर दणाणले
शिरूर कासार : तालुका राष्ट्रवादीच्या वतीने बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. घोषणांनी शहर दणाणून गेले. यामध्ये डॉ. शिवाजी राऊत, अॅड. चंपावती पानसंबळ, युवक प्रदेश उपाध्यक्ष महेबूब शेख, काकासाहेब शिंदे, किशोर हंबर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जरांगे, तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, गोकुळ सवासे, विनोद पवार, किशोर जेधे, अक्षय जाधव, दादासाहेब पवार, सुभाष यमपुरे, युवराज नेटके, डॉ. पाचपुते, कदीर शेख, धर्मा जायभाये, गणेश चव्हाण, अप्पा येवले, संतोष गुजर, रवी आघाव, अमोल चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले
बीडमधील मोर्चात सहभागी व्हा
बीड : बीडमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात येणार आहे. याची सुरूवात शिवणी फाटा ते आंबेडकर पुतळा मोटारसायकल रॅलीने होत असून, आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा निघणार आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे यांनी केले आहे.