राष्ट्रवादी काँग्रेसचा परळीत आरोग्यसेवा सप्ताह; ‘लोकमत रक्ताचे नाते’अंतर्गत महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:26+5:302021-07-14T04:39:26+5:30

या वर्षी सर्वांनी कोरोनाच्या प्रादुर्भावात दुसऱ्या लाटेत अतिशय बिकट परिस्थितीचा सामना केला. विद्यमान परिस्थितीमध्येही अनेक जण दवाखान्यात उपचारार्थ जाऊ ...

Nationalist Congress Party's Parli Health Week; Blood donation camp under 'Lokmat Raktache Naate' | राष्ट्रवादी काँग्रेसचा परळीत आरोग्यसेवा सप्ताह; ‘लोकमत रक्ताचे नाते’अंतर्गत महारक्तदान शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेसचा परळीत आरोग्यसेवा सप्ताह; ‘लोकमत रक्ताचे नाते’अंतर्गत महारक्तदान शिबिर

Next

या वर्षी सर्वांनी कोरोनाच्या प्रादुर्भावात दुसऱ्या लाटेत अतिशय बिकट परिस्थितीचा सामना केला. विद्यमान परिस्थितीमध्येही अनेक जण दवाखान्यात उपचारार्थ जाऊ शकत नाहीत, ही बिकट परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरोग्यदायी उपक्रम ‘आरोग्यसेवा सप्ताह’ आयोजित केला असून, यात विविध आरोग्यविषयक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १५ जुलै रोजी ‘अभिष्टचिंतन सोहळा’, संजय गांधी निराधार योजनेच्या १,५०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप व महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्ड नोंदणीच्या शिबिराचे उद्घाटन होईल. १६ जुलै रोजी धनंजय मुंडे आरोग्यमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात विविध १०० भागांत संपन्न होणाऱ्या मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिराचा शुभारंभ, तर १७ जुलै रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. १८ जुलै रोजी नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर होईल. १९ जुलै रोजी ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत रक्ताचे नाते’ या उपक्रमात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० व २१ जुलै रोजी सर्वांसाठी मोफत औषधासह सर्वरोगनिदान शिबिर तर २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, आरोग्यसेवक व वृक्षमित्रांचा सेवागौरव, तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित केला आहे.

आरोग्य सेवासप्ताहमधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोयटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Nationalist Congress Party's Parli Health Week; Blood donation camp under 'Lokmat Raktache Naate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.