अंबाजोगाईत शेतांना तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:20+5:302021-09-08T04:40:20+5:30
पिके पाण्याखाली नद्या,नाले तुडुंब,शेतांना तलावाचे स्वरूप दोन दिवसांपासुन सूर्यदर्शन नाही अंबाजोगाई : तालुक्यात जोरदार पावसाने नद्या, नाले, तलाव ...
पिके पाण्याखाली
नद्या,नाले तुडुंब,शेतांना तलावाचे स्वरूप
दोन दिवसांपासुन सूर्यदर्शन नाही
अंबाजोगाई : तालुक्यात जोरदार पावसाने नद्या, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत; तर अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने शेतांनाच तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर सुरूच आहे.
...
पडत्या पावसातही पर्यटनाचा आनंद
अंबाजोगाई : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहर परिसरातील मुकुंदराज, नागनाथ मंदिर, रेणुकादेवी मंदिर परिसर, डोंगरतुकाई परिसरात असणारे लहान-मोठे धबधबे पाण्याने कोसळू लागले आहेत; तर काळवटी साठवण तलाव ओसंडून वाहू लागल्याने शहरवासीयांनी पडत्या पावसातही पर्यटनाचा आनंद घेऊ लागले आहेत. अशा सर्वच ठिकाणी निसर्गप्रेमींची गर्दी वाढली आहे.
070921\20210907_134427.jpg
अंबाजोगाईत नद्यांना पूर