नवरत्नांचा पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:46 PM2018-11-07T23:46:25+5:302018-11-07T23:47:06+5:30
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले.
श्रीगुरु बंकटस्वामी भक्त परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाश महाराज बोधले, महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, पंडित उद्धव बापू शिंदे, समाधान महाराज शर्मा, हरिदास भाऊ जोगदंड, आ.संगीता ठोंबरे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी आ. पृथ्वीराज साठे, सभापती संतोष हांगे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, डॉ.अशोक थोरात, जि. प. सदस्य भारत काळे, सचिन कोठुळे, दादासाहेब मुंडे, नारायण शिंदे, समाजसेवक अनिरुद्ध गोरे, मोहन गुंड, अनिल जाधव, सरपंच दादाराव काळे आदी उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात, स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सामाजिक नवरत्नाचा गौरव सत्कार मान्यवर व संत महंतांच्या हस्ते करण्यात आला. यात आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे वैराग्यमुर्ती रामकृष्ण रंधवे बापू, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे सभापती राजसाहेब देशमुख, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सीताफळ सम्राट धैर्यशील सोळंके, महिला शेतकरी विद्या रुद्राक्ष, कारागृह पोलीस प्रशासनात सकारात्मक काम करणारे कारागृह अधीक्षक महादेव पवार, पाणी आणि माती क्षेत्रात काम करणारे जलमित्र संजय शिंदे, अनाथ मुलांच्या बाबतीत काम करणारे संतोष गर्जे, पत्रकारिता क्षेत्रांतील भागवत तावरे, क्रीडा क्षेत्रातील कुस्तीपटू राहुल आवारे यांचे वडील बाळू आवारे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, झाडे भेट व लागवडीचा संकल्प झाला.
या सोहळ्यानंतर समाज प्रबोधनपर निवृती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नाना महाराज कदम आणि प्रा. सुरेश महाराज जाधव तसेच बंकटस्वामी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. प्रास्तविक सुरेश जाधव, सूत्रसंचालन ज्ञानदेव काशिद यांनी केले.