धक्कादायक! कौटुंबिक वादातून नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावाने केला कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:51 PM2022-06-06T13:51:23+5:302022-06-06T14:05:17+5:30

कौटुंबिक कारणातून हल्ला केला असल्याची शक्यता असून हल्लेखोर भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे

Nayab tehsildar Aasha Wagh was attacked with koyata by her brother for family reasons | धक्कादायक! कौटुंबिक वादातून नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावाने केला कोयत्याने हल्ला

धक्कादायक! कौटुंबिक वादातून नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावाने केला कोयत्याने हल्ला

Next

केज (बीड) : येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, आशा वाघ या येथील तशील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे आज आज सकाळी त्या कार्यालयात आपले काम करत होत्या. सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ ( ४५,दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) हा कार्यालयात आला. त्याने काही कळायच्या आता बहिण आशावर कोयत्याने मानेवर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. आशा वाघ याच अवस्थेत जीवाच्या आकांताने शेजारील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात पळाल्या. दरम्यान, कार्यालयात उपस्थित नागरिकांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास पकडून पकडून ठेवले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. आशा वाघ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
कौटुंबिक कारणातून केला हल्ला
हल्लेखोर मधुकर वाघ आणि नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. शेतीच्या आणि अन्य वादातून त्यांने टोकाचे पाऊलं उचलत आज जळगाव येथून येत थेट कार्यालयात घुसून सख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.  

Web Title: Nayab tehsildar Aasha Wagh was attacked with koyata by her brother for family reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.