गेवराई धन्य घोटाळा प्रकरणी नायब तहसीलदार अशोक भंडारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 03:22 PM2020-05-22T15:22:12+5:302020-05-22T15:22:54+5:30
गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ आणि साखर व 6 मालवाहू ट्रक असा तब्बल 69 लाख रुपयाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवला होता.
गेवराई : गेल्या काही दिवसापूर्वी उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यातील फिर्यादी असलेल्या अशोक भंडारे यांना पोलीसा तपासा दरम्यान पोलिसांनी चौकशीअंती त्यांना शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सुत्रा कडुन मिळाली आहे. या प्रकरणात महसूलचा जबाबदार अधिकारीच धान्य घोटाळ्यातील आरोपी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ आणि साखर व 6 मालवाहू ट्रक असा तब्बल 69 लाख रुपयाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात भाजपा नगरसेवक पती अरुण म्हस्के याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सध्या अरुण मस्के फरार असला तरी त्याच्या भावासह संजय राजपुत या गोदामपालवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने नायब तहसीलदार अशोक भंडारे यांची चौकशी केली होती त्यांच्या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून अखेर शुक्रवारी रोजी एस.आय.टि च्या पथकाने नायब तहसिलदार अशोक भंडारे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिली.