विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांसाठी एनडीएलआय म्हणजे माहितीचा खजाना : राहुल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:17+5:302021-08-22T04:36:17+5:30

दत्तोपंत ठेंगडी जन्म शताब्दी वर्ष व ग्रंथपाल दिन यांचे औचित्य साधून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वा. सावरकर महाविद्यालय, श्री ...

NDLI is a treasure trove of information for students, professors, researchers: Rahul Deshmukh | विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांसाठी एनडीएलआय म्हणजे माहितीचा खजाना : राहुल देशमुख

विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांसाठी एनडीएलआय म्हणजे माहितीचा खजाना : राहुल देशमुख

Next

दत्तोपंत ठेंगडी जन्म शताब्दी वर्ष व ग्रंथपाल दिन यांचे औचित्य साधून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वा. सावरकर महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युजर अवेअरनेस ऑन नॅशनल डिजिटल लायब्ररी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये डॉ. देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, १९ जून २०१८ रोजी भारतात एनडीएलआयची सुरुवात झाली. दोनशेपेक्षा अधिक भाषांमधील लाखो विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत, तसेच नीट, जेईई, तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. एनडीएलआयच्या वापराने डिजिटल एज्युकेशनला गती मिळाली आहे. सर्वांनी या प्लॉटफॉर्मवर जाऊन आपली नोंदणी करावी व याचा जास्तीत वापर करावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलूकर म्हणाले की, एनडीएलआय म्हणजे माहितीचा समुद्र आहे. यातून ज्याला जी माहिती पाहिजे आहे ती माहिती मिळू शकते. प्रत्येकाचा ज्ञानात वृद्धी होत आहे. सर्व शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपल्या हातातील मोबाइलचा वापर करून डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती आपला मिळवून अध्ययन / अध्यापन प्रक्रिया जास्त गतिमान करण्यासाठी एनडीएल कसे महत्त्वाचे आहे यासाठी आजच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेबिनारला भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, सहकार्यवाह डॉ. कल्पना चौसाळकर, सहकार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सावरकर संकुलाचे अध्यक्ष गजानन जगताप, कार्यवाह डॉ. विवेक पालवणकर, शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सिद्धेश्वर संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, प्राचार्य महेश देशमुख, प्राचार्य मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, ग्रंथपाल प्रा. सुरेश बन्सोडे, ग्रंथपाल प्रा. तुळशीराम मुंडे, तिन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावरकर महाविद्यालयाच्या ग्रंथपाल तथा वेबिनारच्या संयोजिका डॉ. अनुजा कास्तीकर यांनी केले. आभार डॉ. विनायक देशमुख यांनी मानले.

Web Title: NDLI is a treasure trove of information for students, professors, researchers: Rahul Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.