वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधकाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:51+5:302021-02-12T04:31:51+5:30
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, ...
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
भरधाव वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवली जात आहेत. प्रत्येक वाहनचालक या रस्त्यावरून सुसाट धावण्याची स्पर्धाच करू लागला आहे. या भरधाव वेगातील वाहनांमुळे लहान-मोठे अपघात या परिसरात सातत्याने होऊ लागले आहेत. वाहने चालवताना वेग नियंत्रणात ठेवावा व अपघात टाळावा, असे आवाहन ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी केले आहे.
राज्यमार्गावर अतिक्रमणाचा विळखा
केज : अंबाजोगाई - मांजरसुंबा या राज्य मार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या दरम्यानच बसस्थानक, शिवाजी चौक व प्रमुख बाजारपेठ असल्याने कोंडी होत आहे.
गोदापात्रातील वाळू उपसा थांबवा
बीड : गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावांतून होणाऱ्या वाळू उपशावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील गंगावाडी-राजापूर येथील गोदावरी पात्रातून सर्रास अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
वीज पुरवठा सुरळीत नसल्याने हाल
सिरसाळा : परळी तालुक्यातील सिरसाळा आणि परिसरात सहा तास भारनियमनाशिवाय वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या भागातील रोहित्र दुरुस्त करावेत, महावितरणचे अधिकृत लाइनमन नेमावेत, जुन्या तारा बदलाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.