‘कोरोनाकाळात समन्वयाने काम करण्याची गरज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:11+5:302021-05-18T04:35:11+5:30

येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम ...

‘The need for co-ordinated coronation’ | ‘कोरोनाकाळात समन्वयाने काम करण्याची गरज’

‘कोरोनाकाळात समन्वयाने काम करण्याची गरज’

Next

येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, बीड जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, काकासाहेब शिंदे, कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप सुबरे, सरपंच अशोक पोकळे, नाजिम शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे यांच्यासह सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आ. आजबे यांनी तालुक्यातील आरोग्य व कोरोनाबाबतचा आढावा घेत कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही एक, दोन अधिकाऱ्यांमुळे तालुक्यातील आरोग्ययंत्रणेत विस्कळीतपणा जाणवत आहे ,अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात येईल, असे आजबे यांनी स्पष्ट केले.

Web Title: ‘The need for co-ordinated coronation’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.