स्वच्छता, आरोग्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:06 AM2018-10-18T00:06:19+5:302018-10-18T00:06:40+5:30
वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी हात धुण्याची सवय महत्त्वाची आहे प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करण्यापूर्वी व काहीही खाण्यापूर्वी नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत गरजेची आहे. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या माणसापर्यंत ही सवय कायमस्वरूपी अंगीकारल्यास सर्वांचे आरोग्य अबाधित राहील मात्र त्यासाठी सर्वांनी मिळून एकित्रत प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी हात धुण्याची सवय महत्त्वाची आहे प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करण्यापूर्वी व काहीही खाण्यापूर्वी नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत गरजेची आहे. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या माणसापर्यंत ही सवय कायमस्वरूपी अंगीकारल्यास सर्वांचे आरोग्य अबाधित राहील मात्र त्यासाठी सर्वांनी मिळून एकित्रत प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्ह्यात स्वच्छ कार्यालय पंधरवडा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. सर्व कार्यालये, शाळा, अंगणवाडीत हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून नियमित रोज हात धुण्याची सवय लागावी या उद्देशाने हा उपक्र म घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता खंडारे ,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बांगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिलांच्या स्वच्छ हातांमध्ये कुटुंबाचे आरोग्य आहे. शाळा व अंगणवाडीमधील लहान मुलांच्या हातामध्ये भविष्यातील आरोग्य आहे. हे आरोग्य कायम स्वरूपी टिकण्यासाठी घरातील कर्त्या मंडळींनी मात्र पुढाकार घ्यावा व कायम मार्गदर्शन करावे असेही मत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. उपस्थित विभागाचे प्रमुख, कार्यालय प्रमुख व जिल्हा परिषद कर्मचारी यांना हात धुण्याच्या पद्धतीची माहिती प्रत्यक्ष प्रात्यिक्षकाद्वारे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी आभार मानले. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कार्यालय, शाळा, पंचायत समितीसह ग्रामपंचायतींमध्ये उपक्रम होत आहेत.