कृषी योजनांची माहिती देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:01+5:302021-03-29T04:20:01+5:30

चाऱ्याची साठवण अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. डोंगराळ भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने ...

The need to provide information on agricultural schemes | कृषी योजनांची माहिती देण्याची गरज

कृषी योजनांची माहिती देण्याची गरज

Next

चाऱ्याची साठवण

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. डोंगराळ भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने चारा साठवण करण्याची तयारी सुरू झाली आहे. घरोघरी कापण्यात आलेला ज्वारीचा कडबा झोपडीसारखा उंचावर रचून त्याचा साठा केला जात आहे. उन्हाळ्यात हिरवा चारा कमी झाल्यानंतर गुरांना कोरडा कडबा देत त्यांचे संगोपन केले जाते.

पेट्रोल चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त

अंबाजोगाई - एकीकडे पेट्रोलचे दर वाढल्याने दुसरीकडे पेट्रोल चोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी दुचाकीमधून पेट्रोलची चोरी झाल्याच्या घटना अनेक घटना समोर आल्या आहेत. पेट्रोलची चोरी करणाºया चोरांना पायबंद घालण्यासाठी आता नागरिकच सरसावले आहेत.

समृद्ध गाव स्पर्धेच्या कामांना वेग

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अनेक गावांनी सहभाग नोंदविला आहे. या गावांमध्ये आता स्पर्धेच्या कामांनी मोठा वेग घेतला आहे. प्रामुख्याने कंपोस्ट खत निर्मितीसह जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली जात आहेत. आपले गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी व शेतीचा दर्जा वाढविण्यासाठी ही स्पर्धा शेतकºयांसाठी दिशादर्शक ठरू लागली आहे.

लिंबांची विक्री वाढली

अंबाजोगाई - उन्हापासून गारवा मिळवण्यासाठी उन्हाळ्यात घरोघरी लिंबू शरबत केले जाते. त्यामुळे बाजारात सध्या लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंबाजोगाईच्या बाजारपेठेत सध्या ताजे लिंबू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. कोरोनाच्या कालावधीत सी व्हिटॅमिन म्हणूनही घरोघरी लिंबाची मागणी वाढल्याने भावही वधारले आहेत.

Web Title: The need to provide information on agricultural schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.