मुख्य चौकांमध्ये गतिरोधकाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:55+5:302021-02-05T08:29:55+5:30
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष गेवराई : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. ...
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गेवराई : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. याबाबत येथील नागरिक तक्रारी करत आहेत. परंतु याकडे अद्यापही संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे.
गुटखाबंदी असतानाही सर्रास विक्री सुरुच
माजलगाव : राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी शहरामध्ये अगदी सहजरित्या गुटखा उपलब्ध होतो. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. कारवाईची मागणी आहे. परंतु याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर आहे.
अडथळ्यामुळे कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.
उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसवण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता मोहीम राबवा
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.