गुरांचा बाजार सुरू करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:36+5:302021-06-30T04:21:36+5:30
आरोग्य सेवेकडे लक्ष देण्याची गरज अंबाजोगाई : तालुक्यातील दुर्गम भागात साथीचे रोग झपाट्याने पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात या भागात आरोग्य ...
आरोग्य सेवेकडे लक्ष देण्याची गरज
अंबाजोगाई : तालुक्यातील दुर्गम भागात साथीचे रोग झपाट्याने पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात या भागात आरोग्य सेवेकडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागात रस्ते नसल्याने दळणवळणाची मोठी समस्या आहे. त्यातच पावसाळ्यात नदी-नाल्यांना पाणी राहत असल्याने पायी जाणेही मुश्कील होते. तसेच साथीचे आजार आले तर रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाहीत. त्यामुळे या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये पावसाळ्यात औषधसाठा व इतर वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बाजारात शेतकऱ्यांची गर्दी वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील काही भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्यात येत आहे. शेती मशागतीच्या कामांसह बियाणे व खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. विविध कृषी केंद्रांवर जाऊन शेतकऱ्यांकडून चांगल्या बियाण्याची विचारपूस केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्यांना अद्याप सुरुवात झालेली नाही. परंतु शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
शाळेची घंटा न वाजल्याने नाराजी
अंबाजोगाई : दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात शाळेची घंटा वाजते. पण गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागात सहज ऐकायला येणारा शाळेच्या घंटेचा आवाज ऐकण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक त्या आशेने मात्र वाट पाहात होते. पण यंदाही विद्यार्थ्यांविना शाळा भरणार असेच चित्र आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य काय? हाच प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आता पडायला लागला. आहे. शाळा कधी भरतील या आशेने सर्व चिंतातूर आहेत. परंतु तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी शाळा सध्या तरी ऑनलाईनच सुरू राहतील का? अशी शंका उपस्थित होत आहे.