पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:40+5:302021-01-25T04:33:40+5:30

बीड : रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या ...

Need for water | पाण्याची गरज

पाण्याची गरज

Next

बीड : रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. वेळेवर व सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत.

चाऱ्याची मुबलकता

बीड : दुष्काळी परिस्थितीमुळे मागील काही वर्षांत चाऱ्याची कमतरता बीड जिल्ह्यात भासली होती. मात्र दोन वर्षांपासून पाऊस चांगला झाल्यामुळे चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असून, चार छावण्यांची आवश्यकता भासणार नाही. गुरांना मुबलक चारा मिळणार आहे.

गटारी तुंबल्या

नेकनूर : नेकनूर हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. मात्र गावातील गटारी तुंबल्यामुळे गावकऱ्यांसह बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गटारी साफ करण्याची नागरिकांकडून वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे, मात्र ग्रामपंचायतकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Need for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.