वाळुच्या उत्खननाकडे दुर्लक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित

By शिरीष शिंदे | Published: July 4, 2024 10:14 PM2024-07-04T22:14:37+5:302024-07-04T22:15:13+5:30

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रुजू होताच कामकाजात दुर्लक्ष करणाऱ्यांना दणका दिला आहे.

Neglect of sand mining, Board officials, Talathi suspended | वाळुच्या उत्खननाकडे दुर्लक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित

वाळुच्या उत्खननाकडे दुर्लक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित

बीड: गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळु घाटातून वाळु उत्खननाकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी गेवराई तालुक्यातील धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे व तलाठी किरण प्रभाकर दांडगे यांना ४ जुलै रोजी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रुजू होताच कामकाजात दुर्लक्ष करणाऱ्यांना दणका दिला आहे.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळुघाटाची पाहणी ३ जुलै रोजी केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळुचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. वाळुच्या अवैध उत्खननावर लक्ष ठेवणे ही तलाठी व मंडळ अधिकारी यांची प्राथमिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राक्षसभुवन सज्जाचे तलाठी किरण प्रभाकर दांडगे व धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

Web Title: Neglect of sand mining, Board officials, Talathi suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड