नेताजींचे कार्य आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:26+5:302021-01-25T04:34:26+5:30
माजलगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य हे ...
माजलगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य हे आजच्या सर्व तरुणांसाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.कमलकिशोर लड्डा यांनी केले. श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रा. लड्डा यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बालपणीचे कार्य, भारतीय प्रशासकीय सेवा, स्वराज्य पक्षात सहभाग, मुसोलिनी, हिटलर अशा व्यक्तींचा परिचय, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना, भारतीय स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना आदींची माहिती दिली. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते हेही स्पष्ट केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश दुगड उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गजानन होन्ना यांनी केले. प्रा.डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.