उन्हापासून रोपांची जोपासना करण्यासाठी रोपवाटिकेवर जाळी- A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:23+5:302021-03-29T04:19:23+5:30

धारूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत तीन तालुक्याचा समावेश आहे. या कार्यालयांतर्गत सोनिमोहा, अरणवाडी, भायजळी, विडा, व्हरकटवाडी, आसरडोह, हिंगणी , मोहखेड, कारी, ...

Nets on the nursery to protect the seedlings from the sun-A | उन्हापासून रोपांची जोपासना करण्यासाठी रोपवाटिकेवर जाळी- A

उन्हापासून रोपांची जोपासना करण्यासाठी रोपवाटिकेवर जाळी- A

Next

धारूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत तीन तालुक्याचा समावेश आहे. या कार्यालयांतर्गत सोनिमोहा, अरणवाडी, भायजळी, विडा, व्हरकटवाडी, आसरडोह, हिंगणी , मोहखेड, कारी, धुनकवाड, वडवणी तालुक्यातील देवळा, ढेकणमोहा आदी ठिकाणी रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत . या रोपवाटिकेमध्ये कडुलिंब, कांचन, शिवम, आवळा, जांभूळ, साग, चिंच, खैर, सीताफळ आदी झाडांची रोपे तयार करण्यात आलेली आहेत . यामध्ये ४ लाख ४५ हजार ८१६ लहान तर १ लाख ५० हजार मोठी रोपे आहेत . ही रोपे सात ते नऊ महिने जोपासनी झाल्यानंतर वनविभागाच्या जंगलांमध्ये यातील जून - जुलै महिन्यात लागवड करण्यात येते .

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत . लागवड करण्यात आलेल्या रोपांची जोपासना मजुरांमार्फत करण्यात येते . सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत . एप्रिल-मे महिन्यात उन्हामुळे या रोपांची वाढ खुंटणे, तसेच पाण्याचे अधिक प्रमाण लागते . कोवळ्या झाडांचा बचाव करण्यासाठी सोनीमोहा, अरणवाडी, विडा, व्हरकटवाडी यासह अनेक गावातील रोपवाटिकेमध्ये शेडनेट उभारणी केली आहे . लाकडांचा वापर करून शेडनेट जाळी बांधण्यात आलेली आहे .

===Photopath===

280321\28bed_1_28032021_14.jpg

===Caption===

रोपवाटिकेतील झाडांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी चार रोपवाटिकेमध्ये शेडनेट जाळी बसविण्यात आली आहे

Web Title: Nets on the nursery to protect the seedlings from the sun-A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.