बीडमध्ये २०० खाटांचे नवीन रुग्णालय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:32 AM2021-03-28T04:32:13+5:302021-03-28T04:32:13+5:30

बीड येथे जिल्हा रुग्णालयात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी २०० खाटांचे अतिरिक्त रुग्णालय व्हावे यासाठी ...

A new 200-bed hospital will be set up in Beed | बीडमध्ये २०० खाटांचे नवीन रुग्णालय होणार

बीडमध्ये २०० खाटांचे नवीन रुग्णालय होणार

googlenewsNext

बीड येथे जिल्हा रुग्णालयात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी २०० खाटांचे अतिरिक्त रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. क्षीरसागर हे पालकमंत्री असतानाच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. रुग्णालयासाठी हवी असलेली जागा ही गृह विभागाकडे होती. त्यामुळे माजी मंत्री क्षीरसागर यांनी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ही जागा जिल्हा रुग्णालयासाठी हस्तांतरित केली. त्याच वेळी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया माजी मंत्री क्षीरसागर आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे पूर्ण झाली. आता ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या रुग्णालयाचेदेखील तात्काळ काम सुरू होणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

Web Title: A new 200-bed hospital will be set up in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.