ऑनलाईन शिक्षणाच्या नव्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:04+5:302021-07-16T04:24:04+5:30

अंबाजोगाई : कोरोनामुळे मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू आहे. यामुळे ...

New challenges of online learning | ऑनलाईन शिक्षणाच्या नव्या अडचणी

ऑनलाईन शिक्षणाच्या नव्या अडचणी

Next

अंबाजोगाई : कोरोनामुळे मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू आहे. यामुळे मुलांना वर्गात जाऊन शिक्षण मिळत नाही, मित्रांची भेट होत नाही. घरातल्या घरात मुलांचा कोंडमारा होत असल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. मुलांमध्ये एकटेपणाची भावनाही वाढीस लागली असल्याच्या तक्रारी व नाराजीचा सूर पालकांमधून निघू लागला आहे.

ऑनलाईन अभ्यासाकरिता आता मोबाईल किंवा संगणक आवश्यक आहे. यासाठी इंटरनेट सुविधा असणे नितांत गरजेचे बनले आहे. काही पालक ही सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरत आहेत. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता, सध्याच्या परिस्थितीत लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण योग्य आहे. कारण घराच्या बाहेर पडणे म्हणजे गर्दीत जाणे आले. त्यामुळे घरीच राहून शिक्षण घेणे योग्य आहे. यामुळे मुले शाळेपासून दुरावली आहेत. आता घरात बसूनच पाच ते सहा तास ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

एका घरी दोन मुले असतील, तर पालकांची मोबाईलमुळे कोंडी होत आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गात, शाळेत मुले मित्रांसोबत दंगामस्ती करून शिक्षणाचे धडे घ्यायचे. कोरोना महामारीच्या संकटामुळे निर्बंध आले आहेत. त्याला पर्याय म्हणून शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. शालेय वातावरणात शिक्षण घेताना आनंद असतो. मित्रांसोबत मस्ती करीत शाळेत शिक्षण घेता येते. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे घरातल्या घरात एकलकोंडी राहून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढलेला आहे.

शिक्षणामुळे घराबाहेर पडण्याची गरज नाही. वेळेची व पैशांची बचत काही प्रमाणात होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणाचे महत्त्व कळायला लागले आहे. मुलांना मोबाईल व संगणक हाताळण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. या बाबी सकारात्मक वाटत असल्या, तरी मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

Web Title: New challenges of online learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.