बीड न.प.मध्ये नवीन घंटागाड्या दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:11 AM2018-10-31T01:11:20+5:302018-10-31T01:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बीड नगर पालिकेने सहभाग घेतला आहे, यासाठी स्वच्छता अभियान, घनकचरा प्रकल्प ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बीड नगर पालिकेने सहभाग घेतला आहे, यासाठी स्वच्छता अभियान, घनकचरा प्रकल्प यासह जनजागृती करून संपूर्ण बीड शहर कचरा मुक्त करण्याचा संकल्प न.प.ने हाती घेतला. ३० आॅक्टोबर रोजी ओला व सुका कचरा संकलनासाठी नवीन ६ घंटागाड्या न.प.मध्ये दाखल झाल्या. त्याचे लोकार्पण नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
बीड शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी डिपीआरच्या माध्यमातून ६ नवीन घंटा गाडी (वाहने) खरेदी करण्यात आले आहेत. मंगळवारी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या शुभहस्ते त्याचा लोकार्पण करु न ती वाहने बीडकरांच्या सेवेत दाखल करण्यात आली. यावेळी सभापती मुखीद लाला, नाजू बागवान, साजेद जहागीरदार, विशाल मोरे, रवी शेरकर, वैजिनाथ शिंदे व स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या घंटा गाड्यांमुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यास मदत होणार असुन शहरातील प्रत्येक वार्डात ही वाहने जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचतही या माध्यमातून होणार आहे. भविष्यात अजून १० घंटागाड्या शहरातील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा जमा करण्यास त्यांना मदत करावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.