शेतकऱ्यांवर नवीन संकट; बहरलेल्या पिकांवर नाकतोड्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:01 PM2020-08-01T20:01:03+5:302020-08-01T20:03:22+5:30

मागील दोन दिवसापूर्वी नाकतोडे हजारोंच्या संख्येन मांडवा शिवारात आले.

New crisis on farmers; Nocturnal attack on flowering crops | शेतकऱ्यांवर नवीन संकट; बहरलेल्या पिकांवर नाकतोड्यांचा हल्ला

शेतकऱ्यांवर नवीन संकट; बहरलेल्या पिकांवर नाकतोड्यांचा हल्ला

Next
ठळक मुद्देमोठे गवत आहे त्याच्या नजीकच्या पिकांवर हल्ला चढविला. पावसामुळे या पिकांवर फवारणी हि करणे अशक्य

अंबाजोगाई : तालुक्यातील  पठाण मांडवापरिसरात सध्या टोळवर्गीय नाकतोडय़ांनी हजारोंच्या संख्येने हल्ला चढवला आहे. सध्या केवळ काही भागातील हायब्रीड ज्वारीवर असलेले कीटक इतर पिकांवर पसरल्यास संभाव्य नुकसानीच्या  चिंतेने परिसरातील शेतकरी हैराण आहेत.सतत पडणाऱ्या पावसामुळे या पिकांवर फवारणी हि करणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे.

मागील दोन दिवसापूर्वी नाकतोडे हजारोंच्या संख्येन मांडवा शिवारात आले. पावसामुळे जिथे मोठे गवत आलेले आहे त्याच्या नजीकच्या शेतातील पिकांवर त्यांनी हल्ला चढविला. मोहब्बत पठाण, बळीराम एकनाथ रुद्राक्ष, शिवाजी शिंदे, विष्णू शिंदे यांच्या शेतातील हायब्रीडवर नाकतोड्यांनी ठाण मांडले आहे. नाकतोडे  पूर्ण वाढ झालेल्या ज्वारीची पाने कुरतडून फस्त करत आहेत. साधारण सरळ पानाच्या पिकांवर हे नाकतोडे जाऊन बसत आहेत. अद्याप गावातील इतर पिकांकडे नाकतोड्यांनी मोर्चा वळवला नाही. मात्र, नाकतोडे फोफावले तर इतर पिकांचेही नुकसान होईल या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी कृषी विभागातील ठाकूर, बर्दापुरे यांनी परिसराची  पाहणी केली. प्रभावित भागावर फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. परंतु, सततच्या पावसामुळे फवारणी करता येत नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. 

टोळधाडीचा प्रकार नाही 
ज्या परिसरातील पिकांवर नाकतोडय़ांनी हल्ला चढवला आहे त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. हा प्रकार टोळधाडीचा नाही. शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये. शेतकऱ्यांनी प्रभावित परिसरात फवारणी करावी. फवारणी केलेल्या भागात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये.
– गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी.

Web Title: New crisis on farmers; Nocturnal attack on flowering crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.