मांजरसुंबा-केज राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा नव्याने झाडे लावायला सुरुवात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:04+5:302021-07-13T04:08:04+5:30

विशाल शिंदे नेकनूर : गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मांजरसुंबा ते केज राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडत, रेंगाळत चालू आहे. ...

New planting of trees on Manjarsumba-Cage National Highway - A | मांजरसुंबा-केज राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा नव्याने झाडे लावायला सुरुवात - A

मांजरसुंबा-केज राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा नव्याने झाडे लावायला सुरुवात - A

Next

विशाल शिंदे

नेकनूर : गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मांजरसुंबा ते केज राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडत, रेंगाळत चालू आहे. अगदी संथ गतीने व आपल्या मनमानी पद्धतीने या रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यालगत लावलेली झाडे ही नुसती सोपस्कार म्हणून लावली होती. त्या झाडांना कसल्याही प्रकारची संरक्षण जाळी लावली नव्हती. त्या झाडांना पाणीही दिलं गेलं नाही. त्यामुळे ही झाडे लावल्यापासून काही महिन्यातच जळून गेली. हा झालेला प्रकार सर्वांना माहीत होता; पण यावर बोलायला कोणी तयार नव्हते. त्यामुळं ‘लोकमत’ने या कामाच बिंग उघड पाडलं व कंत्राटदाराची झोप उडवली. ‘लोकमत’ने लावलेली बातमी पाहताच कंत्राटदार खडबडून जागा झाला व लागलीच झाडे लावायला सुरुवात केली. आता तरी या नवीन लावत असलेल्या झाडाची निगा राखा. आज झाडे लावली जात आहे; पण त्यांना कुंपण केले जात नाही. जेणेकरून कुंपण करून झाडे लावली तर ती जास्त काळ टिकतील. जशी झाडे लावायला सुरुवात केली तसेच अर्धवट राहिलेले रोडचे कामपण लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करावे, असे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

110721\291811_2_bed_15_11072021_14.jpeg

नेकनूर लोकमत इम्पॅक्ट

Web Title: New planting of trees on Manjarsumba-Cage National Highway - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.