नवदाम्पत्य एकाच वेळी ठरले खाकी वर्दीचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:34 AM2021-04-04T04:34:44+5:302021-04-04T04:34:44+5:30
सिंदफणा काठच्या लेक आणि सुनाला एकाच वेळी दोघांनाही खाकी वर्दी मिळाल्याने दोन दिवसांपासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वार्णीचा ...
सिंदफणा काठच्या लेक आणि सुनाला एकाच वेळी दोघांनाही खाकी वर्दी मिळाल्याने दोन दिवसांपासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वार्णीचा गणेश शिवराम केदार आणि आष्टी तालुक्यातील आष्टा माहेर असलेली मनीषा या दोघांनीही पीएसआय पदासाठी परीक्षा दिली. त्यात दोघांनीही अभ्यासाची पराकाष्ठा केली. परिस्थिती नाजूक असली तरी त्याकडे फारसे लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि यशदेखील मिळवले. पुढे त्यांचा रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला आणि वार्णीला एकाच वेळी दोन फौजदाराचे गाव हा बहुमान मिळाला. मुलाबरोबरच फौजदार सुनेचे कौतुक केले. आठ मार्च २०१९ ला परीक्षेचा निकाल लागला आणि २१ एप्रिल २०१९ ला हे दोघे विवाहबंधनात अडकले. ७ जानेवारी २०२० पासून ३० मार्च २१ पर्यंत नाशिक येथे खडतर पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या दोघांनाही १ एप्रिल २१ रोजी औरंगाबाद शहरात नियुक्ती मिळाली आहे.
आता ग्रामीण भागातील मुले आणि मुली देखील स्पर्धेत अग्रेसर असल्याचे गणेश केदार आणि मनीषा केदार या दोघांनी सिद्ध करून दाखवले. गावात मुलाबरोबर सुनेचाही सत्कार करत ग्रामस्थांनी त्यांना प्रोत्साहित केले.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी नवनियुक्त उपनिरीक्षक दाम्पत्याचा यथोचित सत्कार करून मार्गदर्शन केले.
धाकट्या अलंकापुरीतही गणेश व मनीषाचा महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी त्यांना शाल देऊन सन्मानित केले. शिरूर शहरात गणेश केदार यांची अभ्यासिका असल्याने मित्र परिवार मोठा असल्याने दोघांचाही ठिकठिकाणी सत्कार केला जात आहे.
मातृभूमीचे ऋण स्मरणात सदैव ठेवूनच काम करणार असल्याचे सांगून
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी. अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. विशिष्ट वयातच यश मिळवता येते, त्यासाठी जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे.
गणेश केदार
मुलीसुद्धा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आता ग्रामीण भागातील मुलीसुद्धा या स्पर्धेत मागे नाहीत. मुलींनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे व ते साध्य करण्यासाठी चौफेर अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे.
मनीषा केदार
===Photopath===
030421\vijaykumar gadekar_img-20210402-wa0063_14.jpg
===Caption===
धाकट्या अलंकापुरीतही गणेश व मनिषाचा महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी त्यांना अशिर्वादाची शाल देऊन सन्मानित केले.