बीडमध्ये वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:02 AM2017-12-06T01:02:59+5:302017-12-06T01:03:12+5:30
स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासह इतर मागण्यांसाठी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासह इतर मागण्यांसाठी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विक्रेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यासाठी राखीव कोटा ठेवावा, बस प्रवासासाठी राज्य संघटनेच्या कार्यकारीणी सदस्य/पदाधिकारी यांना मोफत सेवा मिळावी, शासकीय विश्रामगृह राज्य संघटनेच्या लेटरहेडवर बैठकीस सवलतीच्या दरात मिळावे, विधान परिषदेवर असंघटीत कामगाराचा प्रतिनिधी घेण्यात यावा, यासारख्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. यावेळी प्रताप सासवडे, सुदाम चव्हाण, सुमूर्ती वाघिरे, विद्याभूषण बेदरकर, परमेश्वर खरात, गणेश भालेकर, मधुकर सातपूते, गणेश घोलप आदींची उपस्थिती होती.