चारित्र्याच्या संशयावरून भाच्यांनीच केली आत्याची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:17 PM2017-09-17T16:17:24+5:302017-09-17T16:20:21+5:30
चारित्र्याचा संशय घेत सख्या भावांनी मिळून आत्याचीच कुऱ्हाडीने वर करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील माली पारगाव येथे उघडकीस आली आहे.
माजलगाव ( बीड ) , दि. १७ : चारित्र्याचा संशय घेत सख्या भावांनी मिळून आत्याचीच कुऱ्हाडीने वर करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील माली पारगाव येथे उघडकीस आली आहे. नवनाथ चाफाकानडे व सुनील चाफाकनडे असे आरोपींचे नावे असून हत्या करून दोघेही पोलीस स्थानकात हजर झाली.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी कि, निर्मला रामभाऊ पोपळघट ( 40, रा.कानेगाव खडकी ता. सोनपेठ) या पतीसोबत वाद झाल्याने दोन वर्षापासून माली पारगाव येथे त्यांच्या भावाशेजारील घरात राहत असत. नवनाथ व सुनील यांना त्यांची वागणूक ठीक नसल्याने आमची लग्न जमत नाहीत असा समज होता. यातच त्या दोघांचा त्यांच्या चारित्र्यावरील संशय बळावत केला. शनिवारी ( दि.१६) रात्री ११ च्या दरम्यान त्यांनी निर्मला यांच्या घरात घुसून त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केली.
यानंतर दोघेही माजलगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हजर झाली व हत्येची कबुली दिली. अंमलदार संदीप मोरे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके पुढील तपास करत आहेत.