आष्टीच्या निलेशची ५ वर्षांत तीन शासकीय पदावर नियुक्ती; गावकऱ्यांचा फटाके फोडून आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:29 PM2024-03-22T14:29:31+5:302024-03-22T14:32:15+5:30

शिक्षणाधिकारी पदाचा निकाल येताच गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव

Nilesh Gund of Ashti appointed to three government posts in 5 years; Villagers celebrate by bursting firecrackers | आष्टीच्या निलेशची ५ वर्षांत तीन शासकीय पदावर नियुक्ती; गावकऱ्यांचा फटाके फोडून आनंदोत्सव

आष्टीच्या निलेशची ५ वर्षांत तीन शासकीय पदावर नियुक्ती; गावकऱ्यांचा फटाके फोडून आनंदोत्सव

- नितीन कांबळे
कडा-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरीचे रहिवासी निलेश अर्जून गुंड यांची शिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. पाच वर्षांत एसटीआय, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ते शिक्षणाधिकारी असा प्रेरणादायी प्रवास निलेश यांनी केला आहे. अधिकारी पदाची हॅट्रिक साध्य केल्याने गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. 

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांचे निलेश चिरंजीव आहेत. निलेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय गढी येथे झाले. पुढे त्यांनी पुणे येथून अभियंत्याची पदवी घेतली. याच काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करत २०१७ साली त्यांची एसटीआय पदावर निवड झाली. तर २०२० च्या राज्य सेवेतून त्यांची सहायक प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास विभाग) पदी निवड झाली. सध्या सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे ते कार्यरत आहेत. 

दरम्यान, २०२२ सालच्या राज्य सेवेतून त्यांची शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या यशाची वार्ता समजताच ग्रामस्थांनी गावात फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी मोहन जगताप, भागचंद झांजे, जयश्री जगताप, डॉ मेघा जगताप, डॉ. सुखदा जगताप,डॉ. संपदा जगताप, उद्योजक नागेश मुळीक, गोवर्धन तळेकर, मच्छिंद्र मुळीक, प्रकाश गुंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Nilesh Gund of Ashti appointed to three government posts in 5 years; Villagers celebrate by bursting firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.