बीडमध्ये ३३ केंद्रांवर साडेनऊ हजार विद्यार्थी देणार एमपीएससीची परीक्षा
By शिरीष शिंदे | Published: April 21, 2023 06:33 PM2023-04-21T18:33:39+5:302023-04-21T18:34:08+5:30
३० एप्रिल रोजी गट-ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल रोजी गट-ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा एकूण ३३ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या केंद्रावर जिल्ह्यातील ९ हजार ८४० उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ३३ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाइल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रिक वस्तू व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेसाठी आवश्यक साहित्य उमेदवारांना जवळ बाळगण्यास अनुमती राहील, तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. उमेदवाराने त्यांच्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ८:३० पूर्वी उपस्थित राहावे. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी आदेशात नमूद केले आहे.
अशी आहेत ३३ परीक्षा उपकेंद्रे
चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड बीड, चंपावती इंग्लिश स्कूल, नगर रोड बीड, प्रगती विद्यालय, नगर रोड बीड, इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू हायस्कूल बालेपीर बीड, भगवान विद्यालय, धानोरा रोड बीड, शिवाजी विद्यालय कॅनॉल रोड बीड, यशवंत विद्यालय धानोरा रोड बीड, आदर्श विद्यालय कनॉल रोड बीड, केएसके महाविद्यालय, संस्कार विद्यालय नवीन भाजी मंडई, बीड, स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय सराफा लाइन बीड, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय विप्रनगर बीड, गीता कन्या प्रशाला सुभाष रोड बीड, बलभीम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, किल्ला रोड, मिल्लिया मुलींचे विद्यालय किल्ला मैदान, मिल्लीय मुलांचे ज्यु. व सिनिअर विद्यालय, सेंट ॲन्स इंग्लिश स्कूल, जालना रोड गुरुकुल इंग्लिश स्कूल जालना रोड, श्री छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय शाहूनगर, बंकट स्वामी महाविद्यालय जालना रोड बीड, द. बा. घुमरे पब्लिक स्कूल मुक्ता लॉन्सजवळ बीड, आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज तेलगाव नाका बीड, आदित्य पॉलिटेक्निक कॉलेज तेलगाव नाका बीड, एम. एस. पी. लॉ कॉलेज बार्शी रोड बीड, गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक कॉलेज तेलगाव नाका बीड, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक बार्शी रोड, व्यंकटेश पब्लिक स्कूल भक्ती कन्स्ट्रक्शन बीड, बापूजी साळुंके विद्यालय व डीएड कॉलेज बीड, सर सय्यद अहेमद खान उर्दू हायस्कूल झम झम कॉलनी बीड, के. एस. पी. विद्यालय कालिकानगर बीड, सैनिकी विद्यालय म्हसोबा फाटानगर रोड बीड, पोतदार इंटरनॅशनल स्कूल बीड, चंपावती प्राथमिक विद्यालय नगर रोड बीड या केंद्रांवर परीक्षा होणार आहेत.