चोरीच्या नऊ दुचाकी आरोपीकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:59+5:302021-09-03T04:34:59+5:30
गेवराई : संपूर्ण बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ...
गेवराई : संपूर्ण बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत डीबी पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये गेवराई पोलिसांना यश आले असून, डीबी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे यांनी एका चोरट्याच्या बुधवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे विविध ठिकाणांवरून चोरी केलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
किरण तात्यासाहेब कोल्हारे (वय २६, रा. भांबेरी, ता. अंबड, जि. जालना, ह.मु. देवपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव सांगण्यात आले. गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी गेल्या असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. मात्र, आरोपीचा शोध लागत नव्हता. दरम्यान, गस्त घालत असताना एका खबऱ्याकडून डीबी पथक सपोनि प्रफुल्ल साबळे यांना माहिती मिळाली. लगेच टीमसोबत उमापूर परिसरात गेले असता आरोपी दिसून आला. त्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले चौकशीदरम्यान त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे नऊ वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी मिळून आल्या. अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे, सहायक फौजदार उबाळे, पोहे देशमुख, पोहे जायभाये, पोकॉ काळे यांनी केली.
020921\sakharam shinde_img-20210902-wa0018_14.jpg