बर्ड फ्ल्यू नाही मात्र आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यूसत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:04 PM2021-02-04T19:04:23+5:302021-02-04T19:05:05+5:30

Bird Flu तालुक्यात आजवर मेलेले पक्षी व कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यू अहवाल निगेटिव्ह आला आहे.

No bird flu but death of chickens will not stop in Ashti taluka | बर्ड फ्ल्यू नाही मात्र आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यूसत्र थांबेना

बर्ड फ्ल्यू नाही मात्र आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यूसत्र थांबेना

Next
ठळक मुद्देसाडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

- नितीन कांबळे 

कडा ( बीड ) :  पाटोदा तालुक्यात कावळ्याच्या रूपाने बर्ड फ्ल्यूची लागण झाली असून ब्रम्हगांव, सह शिरापुर येथे देखील कोबड्या दगावल्याची घटना घडली होती. याला प्रतिबंध घालण्यासाठी आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाली नसली तरी कोंबड्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. याचे नेमके निदान अद्याप झाले नसल्याने नागरिकांमध्ये धास्ती आहे. 

आष्टी तालुक्यातील पशुधन विकास कार्यालयात  19 व्या पशु गणणेनुसार   3 लाख  66 हजार  581 एवढी कोंबड्याची संख्या आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले  आहेत. लाखो रुपयांची गुतवणुक करून उभा केलेल्या या व्यवसायाला बर्ड फ्ल्यूची साथ सुरु असल्याने कठीण दिवस आलेत. काही दिवसापूर्वीच शेजारील पाटोदा तालुक्यात बर्ड फ्ल्यूने कावळ्याचा मृत्यू झाला. त्याच बरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव, शिरापुर, सराटेवडगांव ,धानोरा, पिंपरखेड,  खिळद, पाटण,केरूळ येथेही  पक्ष्यासह कोंबड्यांचा मृत्यू झाला. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत पशुसंर्वधन विभागाने सात पथके तैनात केली आहेत.

पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर अशी संख्या आहे. परंतु, तालुक्यात आजवर मेलेले पक्षी व कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यू अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र यानंतरही तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र सुरूच आहे. बर्ड फ्ल्यू नाही तर मृत्यूचे नेमकं निदान होताना दिसत नाही. यामुळे पशुपक्षीपालक चिंतेत आहेत. दरम्यान, तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झालेला अद्याप एकही अहवाल आला नाही. कोंबड्यांचा मृत्यू वेळेवर खाद्य मिळत नसल्याने होत असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी दिली आहे.

Web Title: No bird flu but death of chickens will not stop in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.