चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:09+5:302021-02-09T04:36:09+5:30

बीड : दहा महिन्यांनंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात झाली आहे. शाळांना शासनाच्या ...

No chocolate, I want a sanitizer! | चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !

चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !

Next

बीड : दहा महिन्यांनंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात झाली आहे. शाळांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्या तरी विद्यार्थीदेखील कोरोनाबाबत दक्ष आहेत. ते स्वतःचे सॅनिटायझर आणत आहेत. एक वेळ चॉकलेट नको, मात्र सॅनिटायझर व मास्क आणा, असा हट्ट मुले आपल्या पालकांकडे करत आहेत.

शाळा उघडल्याने विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल होते. पालकांपेक्षा उत्साहदेखील जास्त होता. १ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्यामुळे बाजारात काही दिवसांत सॅनिटायझर व मास्कची मागणी आणि विक्री वाढली आहे. यंदा स्कूलबॅगमध्ये कंपास, पेन, वह्या-पुस्तके, पाण्याची बाटली यासोबतच आता सॅनिटायझरच्या बाटलीची भर पडली आहे, तर गणवेशासोबतच मास्कही वाढले आहेत.

पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा १६५५

सुरू झालेल्या शाळा १६५५

विद्यार्थ्यांची उपस्थिती ७७१९८

शिक्षकांची उपस्थिती ९४६९

एकही शिक्षक, विद्यार्थी बाधित नाही

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षकांची कोविड-१९ चाचणी (अँटिजेन व आरटीपीसीआर) करण्यात आली होती. ९५९५ पैकी १२६ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले होते, तर प्रत्यक्षात शाळा सुरू झल्यापासून ८ फेब्रुवारीपर्यंत एकही शिक्षक अथवा विद्यार्थी कोविड-१९ चे बाधित असल्याचे आढळून आलेले नाही.

विद्यार्थी म्हणतात....

आई-बाबांनी खाऊसाठी दिलेले पैसे मी जमा केले होते. शाळेत जाण्याआधीच जमा झालेल्या पैशातून माझ्या आवडीचा मास्क व सॅनिटायझर आणले. ते संपल्यानंतर मला चॉकलेट नाही आणले तरी चालेल, पण सॅनिटायझर आणायला सांगणार आहे. बटरफ्लाय, कार्टूनचे चित्र असलेले मास्क मला आवडते. रोज वापरते.

- विभावरी उमापूरकर, इयत्ता सहावी

आम्हाला घरून सॅनिटायझर आणण्याच्या सूचना शाळेतून होत्या. शाळेत जाताच रोज स्कूलबॅग व हात सॅनिटाइझ केले जाते. शाळा सुरू होण्याच्या आधी मला बाबांनी सॅनिटायझर व मास्क आणले. त्याचा मी रोज वापर करतो. स्कूलबॅगमध्ये सॅनिटायझरच्या बाटलीचे फारसे ओझे वाटत नाही. उलट सुरक्षित वाटते.

- निकुंज हारकूट, इयत्ता दहावी

दहा महिने घरी ऑनलाईन अभ्यासामुळे कंटाळा आला होता. शाळा सुरू झाल्याने आनंद झाला. मित्र भेटतील म्हणून शाळेत सोशल डिस्टन्स पाळणार असल्याचे सांगून पालकांची संमती घेतली. मला कॉटनचे साधे मास्क चांगले व सुटसुटीत वाटते. इतर मित्रांनाही वापर करता येईल म्हणून आईकडे मोठ्या सॅनिटायझर बाटलीची मागणी केली. स्प्रेवाला सॅनिटायझर मला आवडतो. माझ्या स्कूलबॅगमध्ये आता सॅनिटायझर वाढले आहे.

- रोनिश साळवे, इयत्ता आठवी.

Web Title: No chocolate, I want a sanitizer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.