बीडमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी; आरोग्य विभागालाच नियमांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 02:20 PM2021-02-22T14:20:19+5:302021-02-22T14:21:54+5:30
Corona Vaccination इतरांना कोरोना नियम सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रातच नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसले.
बीड : येथील जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांची तुफान गर्दी झाल्याचे दिसले. आरोग्य प्रशासनाचे येथे कसलेही नियोजन नव्हते. सोशल डिस्ट्न्स, मास्क, सॅनिटायझर आदी येथे दिसले नाही. इतरांना कोरोना नियम सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रातच नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसले. याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती दिली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले असून, २७ जणांनी कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ४१६ एवढी झाली आहे. १७ हजार ५४५ जण कोरोनामुक्त झाले, तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात ५८७ बाधितांची भर
मराठवाड्यात रविवारी ५८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल २०१ आणि जालना जिल्ह्यात १६८ बाधितांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी तब्बल २०१ बाधित रुग्ण आढळले. आता बाधितांची एकूण संख्या ४८ हजार ६३८ झाली असून १२५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात रविवारी ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता एकूण रुग्णसंख्या आता २३ हजार १४९ झाली. ५९२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यात रविवारी १६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण बाधितांची संख्या १४ हजार ६०० एवढी झाली आहे. आतापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ९०७ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ७४४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी २१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ८ हजार २६८ एकूण रुग्णसंख्या झाली असून, ७ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात दुपारपर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ हजार १५४ इतकी नोंद झाली. यातील ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १६ हजार ४५४ रुग्ण उपचाराअंती ठणठणीत झाले आहेत. सध्या १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर बीड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले