धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 08:21 PM2021-01-26T20:21:35+5:302021-01-26T20:31:23+5:30

धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालय सुरू होऊन हि या कार्यालयात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन न झाल्याच्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला.

No flag hoisting at the social forestry office at Dharur, panchnama from the tehsil | धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा

धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा

Next

धारूर - धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालय सुरू होऊन हि या कार्यालयात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन न झाल्याच्या तक्रारी वरून तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला. वरिष्ठ कार्यालया कडून आपल्याला साहीत्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहनास उपस्थीत असल्याचे पंचनाम्यात सांगीतले आहे.

धारूर येथे आॕगस्ट 2020 मध्ये सामाजीक वनिकरण चे कार्यालय सुरू झाले हे कार्यालयात वनक्षेञ अधिकारी व वनरक्षक हि दोन पदे आहेत हे कार्यालय प्रजासत्ताक दिनी चांगलेच चर्चेत आले. या दिवशी या कार्यालयात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन झाले नसल्याची तक्रार तहसीलदार कडे गेली तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी तात्काळ मंडळ अधिकारी नजिर खुरेशी यांना या कार्यालयाचा पंचनामा करण्यास पाठवले त्यांनी आडस रोड वर भाड्याचे जागेत असणारे ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्यांनी पंचनामा केला असता या कार्यालयात वनक्षेञ अधिकारी जे आर भांगे हे उपस्थित होते त्यांनी यावेळी वरीष्ठ कार्यालया कडून आपणास कुठलेच साहीत्य पुरवले नसल्याचे सांगीतले शेजारिल शाळेत आपण ध्वजारोहनास उपस्थित होतो असे पंचनाम्यात सांगीतले आसल्याचे मंडळ अधिकारी नजिर खुरेशी यांनी सांगितले. पंचनामाचा अहवाल तहसील कार्यलयात देऊन पुढील कारवाई वरीष्ठाचे आदेशा नुसार केली जाईल आसे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगितले.

या कार्यालयावर ध्वजारोहन न केल्या बद्दल काय कारवाई होणार यांला दोषी कोन आॕगस्ट 2020 ला कार्यालया झाले म्हणल्या वर भारतीय स्वातंञ्य दिनी ध्वजारोहन झाले का आसा हि प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयाची शहरात चर्चा सुरू होती. 

Web Title: No flag hoisting at the social forestry office at Dharur, panchnama from the tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.