यादीत नाव असूनही इंजेक्शन मिळेना; मेडिकलसमोर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:12+5:302021-04-22T04:35:12+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. एका इंजेक्शनसाठी नातेवाईक दिवसरात्र जागरण करीत आहेत. काही ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. एका इंजेक्शनसाठी नातेवाईक दिवसरात्र जागरण करीत आहेत. काही नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या घरासमोर रात्र जागून काढली. परंतु इंजेक्शन मिळाले नाही. अखेर नातेवाईकांचा संताप पाहून त्यांचे अर्ज स्विकारण्यात आले. हे अर्ज घेऊन संबंधित मेडिकलला पाठवून तेथून इंजेक्शन घेण्यास सांगितले. याबाबत मेडिकलचालकांना प्रशासनाकडून सुचनाही केल्या होत्या. परंतु काही मेडिकलचालक इंजेक्शन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळीही जालना रोडवरील माऊली हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता. यादीत नाव असूनही इंजेक्शन का मिळत नाही, यावर चालकासोबत बाचाबाची झाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर इंजेक्शन देऊन हा वाद मिटल्याचे सांगण्यात आले.
...
यादीत नाव असूनही इंजेक्शन मिळत नाही, अशी तक्रार आलेल्यांना नवे इंजेक्शन येताच दिले जातील. बुधवारी दिवसभरात एकही इंजेक्शन मिळाले नाही. माऊली मेडिकललाही इंजेक्शन देण्याच्या सुचना केल्या आहेत.
-रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड.
===Photopath===
210421\21_2_bed_21_21042021_14.jpeg
===Caption===
माऊली हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व नातेवाईकांचे म्हणने जाणून घेताना शिवाजीनगर ठाण्याचे अधिकारी.