कोणीही या अन् विनामास्क फिरा, बीड नगर पालिकेत कोरोना नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:24+5:302021-02-27T04:45:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जे लाेक विनामास्क बाहेर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जे लाेक विनामास्क बाहेर फिरतील त्यांना अडवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. हे योग्य असले तरी इतरांवर कारवाई करणाऱ्या पालिकेतच नियमांचे उल्लघंन होत असल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. येथे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक विनामास्क दिसले. त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली दिसली नाही. कोरोनाचे सर्व नियम बीड पालिकेत पायदळी तुडविले जात होते.
बीड शहरात सध्या विनामास्क फिरणाऱ्या १५६ लोकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २०० ते ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे नागरिक मास्क वापरत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने या कारवाया योग्य आहेत. परंतु, यासाठी स्वत: देखील नियमांचे पालन करणे आवश्कय आहे. परंतु, तसे बीड पालिकेत झालेले दिसत नाही. येथे कसलेही सोशल डिस्टन्स अथव मास्क वापरला जात नसल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
४० टक्के कर्मचारी विनामास्क
शहरात फिरून कारवाई करणारे कर्मचारी कार्यालयात आल्यावर मास्क काढून अथवा हनवटीला लावून सर्रासपणे फिरताना दिसतात. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. इतरांना नियम सांगणाऱ्या पालिकेतीलच जवळपास ४० टक्के अधिकारी, कर्मचारी कोरोना नियमांचे उल्लंघन करतात.
मास्क वापरणे बंधनकारक, आता पालिकेतही सूचना देऊ
काेरोनापासून बचावासाठी सर्वांनीच मास्क वापरणे गरजेचे आहे. जे वापरत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. बीड पालिकेतही अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामासाठी येणारे नागरिक मास्क वापरत नसतील तर त्यांच्यावरही कारवाईच्या सूचना केल्या जातील.
- युवराज कदम,
कार्यालयीन अधीक्षक, बीड नगर परिषद
===Photopath===
260221\262_bed_11_26022021_14.jpg
===Caption===
नगर पालिकेच्या इमारतीत अगदी गेटच्या आतमध्ये विनामास्क व साेशल डिस्टन्स न ठेवता उभारलेले लोक दिसत आहेत.