'एकही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही'; पालकमंत्री मुंडेंची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 12:23 PM2021-09-02T12:23:44+5:302021-09-02T12:24:51+5:30

Guardian Minister Dhananjay Munde News : आष्टी तालुक्यातील मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या गावांच्या पाहणी दौऱ्याला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडी येथून सुरुवात केली.

'No one will be deprived of the lost grant'; Guardian Minister Dhananjay Munde testified directly from the farmers' field | 'एकही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही'; पालकमंत्री मुंडेंची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्वाही 

'एकही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही'; पालकमंत्री मुंडेंची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्वाही 

Next

कडा ( बीड ) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे व शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी थेट गावातील बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी अनुदानापासुन वंचित राहणार नसल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी दिली. ( 'No one will be deprived of the lost grant'; Guardian Minister Dhananjay Munde testified directly from the farmers' field) 

आष्टी तालुक्यातील मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या गावांच्या पाहणी दौऱ्याला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडी येथून सुरुवात केली.  यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी बिनोदशर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, तहसीलदार राजाभाऊ कदम, आण्णा चौधरी, डॉ. शिवाजी राऊत, सतिश शिदे, शिवाजी डोके, शिवा शेकडे, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख टकले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री धंनजय मुंडे म्हणाले की, आता नुकसानीचे पूर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसूल, कृषी, विमा कंपनी असे तिनही अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकारकडून मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - काळरात्र ! दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुण जागीच ठार

Web Title: 'No one will be deprived of the lost grant'; Guardian Minister Dhananjay Munde testified directly from the farmers' field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.