देयके न मिळाल्यामुळे छावणी बंद करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:03 AM2019-05-22T00:03:06+5:302019-05-22T00:03:36+5:30
मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बीड : मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बुधवारपासून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय छावणी चालक संघटनेच्या वतीने घेतला आहे. याचे जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
जिल्ह्यात चारा उपलब्ध नसल्यामुळे चारा छावणी चालकांना जिल्हा तसेच परराज्यातुन चारा चढ्या दराने विकत आणावा लागत आहे. यामुळे मागील वर्षापेक्षा खर्च दुप्पट वाढला आहे. परंतु शासनाचा निर्णय प्रति जनावरं ९० रुपये व लहान जनावरांसाठी ४५ रुपये देण्याचे ठरलेले असताना देखील, प्रत्येकी ७० व ३५ रुपया प्रमाणे देयके दिली जणार आहेत. त्यामध्ये देखील मुळ देयकाच्या रक्कमेत २५ टक्के कपात करुन देयके अदा केली जाणार आहेत. त्यामुळे छावणी चालकांवर हा अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे. ८ मे रोजी चारा छावणी चालक संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन दिले होते. त्यावेळी देयके १३ मे पर्यंत मिळाली नाहीत तर १४ मे रोजी छावणी बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, देयके अदा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. म्हणून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे घेतला होता. परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. व ९ ते ११ मे या दरम्यान केलेल्या तपासणीत जनावरांची संख्या ५० पेक्षा कमी आढळून आलेल्यांना देखील भरमसाठ दंड अकारण्यात आला आहे. वास्तविक पाहता २० ते २५ बैल जोड्या कामासाठी शेतकरी आपल्या शेतात घेऊन जातात, त्यामुळे ही तफावत होती तरी देखील तपासणी अधिकाºयांनी हालचाल नोंदवहीची दखल न घेता कारवाई केल्यामुळे छावणी चालकांची पिळवणूक होत आहे. या सर्व कारणांचा विचार केला तर छावणी चालकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येते त्यामुळे बुधवारपासून चारा छावणी बंद करण्याचा निर्णय छावणी चालक संघटनेने घेतला आहे. यावेळी छावणी चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक हिंगे, बबनराव गवते, प्रकाश कवटेकर, बळीराम गवते, अशोक सुखावसे, राजेंद्र मस्के, कलंदर पठाण, वैजीनाथ तांदळे, रमेश पोकळे, गणेश उगले आदींसह मोठ्या संख्येने छावणी चालक उपस्थित होते.
संघटनेसोबत जिल्हाधिकाºयांची बैठक
छावणी चालकांनी चारा छावणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतले. यामध्ये प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करीत देयके अदा केले जातील, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
बैठकीनंतर चारा छावण्या बंद न करण्याच्या निर्णयावर तोडगा निघाला असल्याचेही जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.