बसमध्ये बसू दिले नाही म्हणून बाप लेकाची वाहकास दगडाने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:33 PM2017-12-15T16:33:21+5:302017-12-15T16:34:27+5:30

बस खचाखच भरलेली असल्याने त्यात बसण्यास मज्जाव करणाऱ्या वाहकास बाप-लेकांनी बस अडवून मारहाण केल्याची घटना पाटोदा (म.) - अंबाजोगाई रोडवर घडली.

Not being able to sit in the bus so the father's driver hit the stone | बसमध्ये बसू दिले नाही म्हणून बाप लेकाची वाहकास दगडाने मारहाण

बसमध्ये बसू दिले नाही म्हणून बाप लेकाची वाहकास दगडाने मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्दे गाडीत सहसा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे गाडी खचाखच भरली होती. यावेळी पीरखां युनुस पठाण हा युवक गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होता.

अंबाजोगाई : बस खचाखच भरलेली असल्याने त्यात बसण्यास मज्जाव करणाऱ्या वाहकास बाप-लेकांनी बस अडवून मारहाण केल्याची घटना पाटोदा (म.) - अंबाजोगाई रोडवर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लातूर - अंबाजोगाई (धानोरा, वांगदरी मार्गे) या लातूर आगाराच्या बसचे वाहक विष्णुदास विक्रम मुदामे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास पाटोदा (म.) येथून प्रवाशी गाडीत घेऊन अंबाजोगाईकडे निघाले होते. या गाडीत सहसा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे गाडी खचाखच भरली होती. यावेळी पीरखां युनुस पठाण हा युवक गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होता.गाडीमध्ये जागा नाही, पाठीमागून येणाऱ्या गाडीत या असे मुदामे यांनी त्यास सांगितले. 

यावर काहीही न ऐकता तरीदेखील तो बसमध्ये चढला आणि गोंधळ करू लागला. थांब तुला दाखवतोच असे वाहकास म्हणत त्याने वडिलांना बोलावून घेतले. वडील युनुस दगडू पठाण (रा. पाटोदा म.) याने रस्त्यात गाडी आडवी लावून बस अडविली आणि दोघा बापलेकांनी वाहक विष्णुदास मुदामे यांना बसच्या खाली खेचून दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. सदर फिर्यादीवरून पीरखां युनुस पठाण आणि युनुस दगडू पठाण या दोघांवर कलम ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास हवालदार सौन्दनकर करत आहेत.

Web Title: Not being able to sit in the bus so the father's driver hit the stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.