चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते; संदीप क्षीरसागरांकडे केला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:17+5:302021-07-17T04:26:17+5:30

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. ...

Not everything that shines is gold; Sandeep warned Kshirsagar | चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते; संदीप क्षीरसागरांकडे केला इशारा

चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते; संदीप क्षीरसागरांकडे केला इशारा

Next

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

बीड : कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून माझादेखील उत्साह वाढतो. सत्तेत असो वा नसो, विकासाची प्रक्रिया चालूच राहील. चमकणारी वस्तू सोनेच असते असे नाही हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांचा बोलण्याचा इशारा आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे होता.

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे, दिलीप गोरे, जिल्हा संघटक नितीन धांडे, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, रतन गुजर, शहर प्रमुख सुनील सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविणे हा उद्देश आहे. अडचणी असतानाही राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. संकटे कितीही आली तरी विकासाची साखळी पुढे न्यावीच लागते.

पीक विम्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा बंधारे, रस्ते, विजेचा प्रश्न असे अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकचेही अनेक प्रस्ताव मी स्वतः दाखल केलेले आहेत. आता नवीन दोन महसूल मंडळे तयार झाली आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील. आपण दाखल केलेले प्रस्ताव मंजूर झाले असून, यावर काही जण आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर शिवसैनिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सत्तेत असो वा नसो विकासाची प्रक्रिया चालूच राहील, चमकणारी वस्तू सोनेच आहे असे नसते हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मलादेखील शक्ती मिळते. यापुढे प्रत्येक गावच्या प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

या वेळी नगरसेवक शुभम धूत, विठ्ठल बहीर, मनेष भोस्कर, दत्ता काशिद, अर्जुन नलावडे, कालिदास नवले, मुकेश भोकरे, अशोक सोळंके, किशोर पिसाळ, पांडुरंग भोसकर यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

160721\16bed_1_16072021_14.jpg

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Not everything that shines is gold; Sandeep warned Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.