हा बर्फ नव्हे, तर प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर आलेला फेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:09 AM2019-06-23T00:09:14+5:302019-06-23T00:09:24+5:30
नामलगाव परिसरात असलेल्या करपरा नदीतील पाण्यावर प्रदुषणामुळे फेस जमा झाल्याचे पाहवयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे नद्या नाल्यांमध्ये पाणी वाहू लागले होते. मात्र, शहराजवळील नामलगाव परिसरात असलेल्या करपरा नदीतील पाण्यावर प्रदुषणामुळे फेस जमा झाल्याचे पाहवयास मिळाले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांचे आभाळाकडे डोळे लागले होते. जून महिन्यातील २० दिवस उलटून देखील पावसाचा थेंब देखील पडला नव्हता. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजासह नागरिक सुखावले आहेत. तसेच खरीप पेरणीचा हंगाम मात्र, लांबण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली असून, खते बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. मात्र, चागंला पाऊस पडेपर्यंत पिण्याचा प्रश्न कायम राहणार आहे. तसेच पहिल्या पावसात नामलगाव येथील करपरा नदीला आलेल्या पाण्यात प्रदुषणामुळे बर्फासारखा फेस आल्याचे पहायला मिळाले.