नोंद असावी ! आष्टी तालुक्यात शनिवारी ८ तास विज पुरवठा खंडित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 01:07 PM2020-12-18T13:07:07+5:302020-12-18T13:07:25+5:30
१३२ के. व्हि. वीज केंद्राच्या दुरूस्ती व देखभालीचे होणार काम
आष्टी : तालुक्यातील १३२ के.व्ही वीज केंद्राच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी उद्या शनिवार दि.१९ डिसेंबर रोजी वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी विद्युतवर अवलंबून असलेल्या उपकरणांपासून होणारी कामे शुक्रवारीच करून घ्यावीत असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील १३२ के.व्ही. केंद्र असून तेथे अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी व देखभालीच्या कामासाठी वीज पुरवठा शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे . कामाच्या गरजेनुसार वीजपुरवठा खंडित होण्याच्या वेळेत बदल देखील होऊ शकतो. संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार असल्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी मोबाईल बॅटरी चार्ज करून ठेवाव्यात, पाण्याच्या टाक्या भरून ठेवाव्यात तसेच विद्युतवर अवलंबून असणारी कामे आदल्या दिवशीच करुन घ्यावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.
थकबाकी भरण्याचे आवाहन
आष्टी तालुक्यात घरगुती व्यवसायिक व औद्योगिक थकबाकी १४.७० कोटी,१३३ कोटी शेती पंपाची, २७ कोटी सार्वजनिक दिवा बत्ती व पाणी पुरवठा योजना यांची थकबाकी आहे. थकबाकी तात्काळ भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी केले आहे.