बीड पालिकेतील गैरकाराभाराबाबत आजी-माजी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:12 AM2019-12-22T00:12:54+5:302019-12-22T00:13:28+5:30

बीड : बीड नगर परिषदेत विविध योजनांतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. याची चौकशी केली असता यात ...

Notice to Ex-Head Officers on Misconduct in Beed Municipality | बीड पालिकेतील गैरकाराभाराबाबत आजी-माजी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

बीड पालिकेतील गैरकाराभाराबाबत आजी-माजी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

Next
ठळक मुद्देगैरकारभार प्रकरण। प्रादेशिक उपसंचालकांनी मागविला खुलासा

बीड : बीड नगर परिषदेत विविध योजनांतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. याची चौकशी केली असता यात तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत यांना दोषी धरत प्रादेशिक उपसंचालकांनी नोटीस दिली आहे. तर अभिलेखाची माहिती न पुरविल्याने सध्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनाही प्रादेशिक उपसंचालकांनी नोटीस दिली आहे.
कोणत्याही ई-निवीदा प्रक्रिया राबविताना शासनाच्या व नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, प्रशासन अधिकारी मिलींद सावंत यांच्याकडे बीड पालिकेचा अतिरिक्त पदभार असताना त्यांनी ३, ५ व ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसीद्ध झालेल्या ई-निविदा नियमानुसार केल्या नसल्याचे चौकशीत दिसून आले आहे. हाच मुद्दा पकडून प्रादेशिक उपसंचालक अ‍ॅलिस पोरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत २४ तासांत खुलासा करण्यासही सांगितल्याचे पत्रात नमुद आहे.
दरम्यान, बीड पालिकेतील गैरकाराभाराबाबत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून न्यायालयात याचीका दाखल केली होती. यात सुनावण्याही झाल्या आहेत. पोलिसांनी एका पत्राद्वारे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले पत्र चुकिचे असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे बीड पालिकेतील कारभाराबाबत कारवाई होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
माहिती न दिल्याने दोरकुळकरही आले अडचणीत
गैरकारभाराच्या चौकशीसाठी नियूक्त केलेल्या समितीला अभिलेख उपलब्ध न करून देणे सध्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना अंगलट आले आहे.
उपसंचालकांनी त्यांनाही नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. या प्रकरणात आता एक एक अधिकारी रोज अडकत चालल्याचे दिसत आहे.

Web Title: Notice to Ex-Head Officers on Misconduct in Beed Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.