जमिनीवर बसून परीक्षा प्रकरणी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:12 AM2020-02-21T00:12:16+5:302020-02-21T00:12:44+5:30

बीड : १८ फे्रबुवारीपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील अतुल महाविद्यालय परीक्षा केंद्रावर ...

Notice given to the Director of the Examination Center sitting on the ground | जमिनीवर बसून परीक्षा प्रकरणी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

जमिनीवर बसून परीक्षा प्रकरणी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

Next
ठळक मुद्देअसुविधेप्रकरणी बोर्डाला अहवाल : डेस्क केले उपलब्ध, गुरुवारची परीक्षा सुरळीत

बीड : १८ फे्रबुवारीपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील अतुल महाविद्यालय परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. याबाबत तातडीने कार्यवाही करत केंद्र संचालकांना जाब विचारत सुविधा पुरविण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. या केंद्रातील तीन वर्गखोल्यांमध्ये ड्यूएल डेस्कची सुविधा केल्याने गुरुवारी भाषा विषयाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडथळा आला नाही.
परीक्षा केंद्र मंजूर करताना बोर्ड व जिल्हा दक्षता समिती तसेच शिक्षण विभागाकडून ड्यूएल डेस्क, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, इमारत, परिसर स्वच्छता, सुरक्षितता आदी मुद्यांवर सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेले असतात. तरीही १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत अतुल महाविद्यालय परीक्षा केंद्रावर तीन वर्ग खोेल्यांतील विद्यार्थ्यांना जमिनीवर बसावे लागले. प्रत्येक वर्ग खोलीत २५ प्रमाणे ७५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. १८ रोजी परीक्षेला उपस्थित ६८ विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर बुधवारी तहसीलदार श्रीराम बेंडे व जमीर यांनी सदर परीक्षा केंद्रावर जाऊन केंद्रातील ड्यूएल डेस्कचा आढावा घेतला. केंद्र संचालक व महाविद्यालयाच्या संस्थाचालकांशी चर्चा केली. संस्था चालकांनी काही डेस्क उपलब्ध केले. उर्वरित आवश्यक डेस्क जमीर यांनी जवळच्या एका शाळेतून उपलब्ध केले. त्यामुळे गुरूवारी मराठी व उर्दू विषयांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची सोय झाली. मराठी परीक्षेसाठी १८७ विद्यार्थी उपस्थित होते व २२५ डेस्क उपलब्ध होते, असे उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांनी सांगितले. तर परीक्षा कालावधी संपेपर्यंत आता या केंद्रावर अडचण येणार नसल्याचे शिरुरचे गटशिक्षणाधिकारी शेख जमीर यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा केंद्रांवर सुविधा उपलब्ध असल्याबाबत केंद्र संचालकांकडून अहवाल मागविले आहेत.
बोर्डाच्या सचिवांना अहवाल पाठविला
इंग्रजी पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांना झालेल्या असुविधेप्रकरणी शिक्षणाधिकारी (मा.) उस्मानी नजमा यांनी या केंद्राला भेट देत संचाकांना धारेवर धरले. तसेच कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. तसेच याप्रकरणी शिक्षण विभागाने विभागीय मंडळाच्या सचिवांना अहवाल पाठविला आहे.

Web Title: Notice given to the Director of the Examination Center sitting on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.