संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

By शिरीष शिंदे | Published: September 11, 2022 02:54 PM2022-09-11T14:54:11+5:302022-09-11T14:54:45+5:30

बीड शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे.

Notice to three employees in case of missing files | संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

Next

- शिरीष शिंदे  
बीड: शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे. मुख्य सहायक यु.पी. सानप व सेवा निवृत्त परिक्षक भूमापक एच.व्ही. तिवारी, परिक्षण भूमापक ए.एस. उजगरे अशी नोटीस बजावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरातील जुना मोंढ्याची संचिका मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे दोन वर्षांपूर्वी अर्ज केला होता. मात्र, त्यांना संचिका देण्यात आली नाही. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर संचिका गहाळ झाली असल्याची बाब समोर आली. या प्रकरणी त्यांच्याकडून सदरील संचिका मिळण्यासाठी नियमित प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, उपअधीक्षक भूमी अभिलेख माणिक मुंडे यांनी सानप व तिवारी यांना नोटीस बाजवली आहे. त्यात नुमूद केले आहे की, बीड शहरातील सर्व्हे नंबर १ व २ ची मोजणी सन २००७ मध्ये झाली होती. सदरील संचिकेची आज शोध घेतला असता ती आढळून येत नाही. आपली बदली झाली असता त्यावेळी ही संचिका आपण कोणाकडे हस्तांतरीत केली होती, ती हस्तांतरण यादी आठ दिवसात दाखल करावी किंवा त्या संचिकेचा शोध घेऊन सादर करावी. या संचिकेबाबत लेखी म्हणने सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यु.पी. सानप हे मुख्यालय सहायक म्हणून शिरुर येथे सध्या कार्यरत आहेत तर तत्कालीन परिक्षक तिवारी सेवा निवृत्त झाले आहेत.
 या पुर्वी ही बाजावल्या आहेत इतरांना नोटीस
तत्कालीन परीक्षण भूमापक आर.आर. विभुते, तत्कालीन नगर भूमापन लिपिक व्ही.डी. मुळे व अभिलेखापाल व्ही.बी. सोनवणे यांना समज देऊन संचिकेचा शोध घेऊन ती सादर करण्याचे यापुर्वी आदेशित केले होते. ५ फेब्रुवारी २०२१ च्या लेखी खुलाशात सदरची संचिका अभिलेखात शोध घेतला असता आढळून येत नाही, असे उपअधीक्षक माणिक मुंडे यांनी जिल्हा अधीक्षकांना पत्रान्वये कळवले होते. त्या पत्रावर उत्तर देताना भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करुन नियमानुसार गहाळ संचिका पुनर्गठीत करावी, असे आदेशित केले होते. आता पुन्हा याच प्रकरणी इतर तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

Web Title: Notice to three employees in case of missing files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड