...आता मोबाइलवरच करा ई-पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:36 AM2021-08-26T04:36:02+5:302021-08-26T04:36:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. ...

... Now do e-crop survey on mobile only | ...आता मोबाइलवरच करा ई-पीक पाहणी

...आता मोबाइलवरच करा ई-पीक पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मोबाइल ॲपवर ई-पीक पाहणी ॲप उपलब्ध करू देण्यात आलेला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश केलेला आहे. त्यानुसार हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी केले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमधील प्ले-स्टोअरवर जाऊन आपल्या मोबाइलमध्ये नवीन ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे. पूर्वीचे जुने ॲप डिलीट करावे. आपणास ई-पीक पाहणीचे तलाठी व कृषी सहायक यांच्यामार्फत गाववार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आपला सहभाग मोलाचा आहे. गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल, धान्य दुकानदार, तंटामुक्ती अध्यक्ष, बचतगट प्रतिनिधी, अध्यक्ष, सहकारी सचिव, शेतकरी उत्पादक संघ अध्यक्ष, माविम संयोगिनी, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहायक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विद्यार्थी, प्रगतिशील शेतकरी, डॉक्टर्स, सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, आपले सरकार सेवा केंद्र यांच्या प्रतिनिधींनी ई-पीक पाहणी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, तसेच व्हॉट्सॲप असल्यास ग्रुपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी ॲपच्या संबंधी माहिती घ्यावी. यापुढे ई-पीक पाहणी काम शेतकऱ्यांना स्वत:च ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्यांना शोधण्याची गरज भासणार नाही. ई-पीक पाहणीसोबतच इतरही विविध नोंदी शेतकऱ्यांना करता येणार असल्यामुळे पीकविमा, पीककर्ज, शासकीय मदत इ. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. आपले संबंधित तालुक्याला हेल्प डेस्कच्या माध्यमातून सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत ई-पीक पाहणी संबंधित शंका व अडचणी असल्यास त्यासंदर्भात माहिती मिळणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

...

सर्व शेतकऱ्यांना मोबाइलवर प्ले स्टोअरमधून हे ॲप सहज घेता येते. या ॲपमध्ये सर्वांना समजेल, अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकतो. पिकांचा फोटो काढून ते ॲपवर ‘अपलोड’ करू शकतात. काही ठिकाणी मोबाइल किंवा इतर समस्या येऊ शकतात. परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा. ज्यांना अडचणी येतील त्यांच्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल.

-राधाबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी, बीड.

250821\25_2_bed_16_25082021_14.jpg

ई-पीक पाहणी प्रयोग 

Web Title: ... Now do e-crop survey on mobile only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.